सशत्र क्रांतीची वाटचाल करणाऱ्या सावरकरांचे ठायी साहित्य शारदेची उपासना करण्याची शक्तीसुद्धा तेवढीच उत्कट होती याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक माणूस काही मूल्ये आणि निष्ठा घेऊन जीवनाची वाटचाल करीत असतो. अर्थात प्रत्येकाची मूल्ये, निष्ठा वेगवेगळ्या असणार. सावरकर देखील याला अपवाद नव्हते. अंदमान सारख्या तुरुंगात असताना देखील त्यांच्या प्रतिभेने उत्तुंग भरारी घेतलेली दिसते. अशा गोष्टी वेड असल्याशिवाय होत नसतात. अनेक देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी तुरुंगात लेखन केलेले दिसते, पण सावरकरांच्या वाटयाला आलेल्या यातनामय तुरुंगवासात त्यांनी निर्माण केलेले काव्य केवळ अतुलनीय म्हणवे लागेल.
अगदी बालवयापासून तो जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत सावरकरांनी देशाचे स्वातंत्र्य हीच केवळ निष्ठा मानली. सर्वस्वाचा त्याग हे त्यांचे मूल्य होते. ते केवळ क्रांतिकारकांचे मुकुटमणीच नव्हते, तर ते तळमळीचे क्रियाशील समाजसुधारक होते. हिंदुधर्मातील कालबाह्य परंपरांवर त्यांनी केवळ शब्दानेच नव्हे तर कृतीने देखील असूड ओढले. तुम्ही-आम्ही सारे हिंदू हा विचार त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणातून मांडणारे ते आचारवंत होते. काव्याच्या माध्यमातून त्यांनी हा विचार प्रभावीपणे मांडलेला दिसतो. रत्नागिरीतील आपल्या स्थानबद्धतेच्या काळात हा कर्मयोगी सर्व जातीधार्मांची सहभोजने आयोजित करीत होता आणि त्या त्या प्रसंगी कवितेच्या माध्यमातून समरसतेचा विचार प्रवाहित करीत होता. त्यांनी आयोजिलेल्या अशा सहभोजनाच्या उपक्रमांचे कौतुक माननीय भाई माधवरावजी बागल, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेले आहे. कोणताही कार्यक्रम असो हा सावरकर नावाचा सरस्वत आपली साहित्य शिल्पे घेऊन धावून जाई. आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमाप्रमाणेच काव्याच्या माध्यमातून देखील समाज मनाला जाग आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात त्यांच्या वाटयाला हालअपेष्टा, यमयातना आल्या. त्या त्यांनी सहन केल्या कारण स्वातंत्र्य हे त्यांचे मूल्य होते. या अपार कष्टात देखील त्यांच्यातला कवी जागा राहिला याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मायभूमी सोडून परदेशात असताना मायभूमीच्या दर्शनासाठी आक्रंदणारे त्यांचे मन आपल्याला त्यांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला या ‘सागरास’ या कवितेतील ओळीमधून दिसून येते. प्रत्येक वेळी ते गंभीरपणाच काव्यात व्यक्त करीत असत असे नव्हे. त्यांची ‘तारकांस पाहून’ वाचतांना त्यांचातल्या सर्जनशील कवीचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. स्वातंत्र्योत्तर कालखंडापेक्षा स्वातंत्र्यपूर्व काळातच सावरकरांची कविता शब्दबद्ध झालेली दिसते. याचे कारण त्यांची जीवननिष्ठा. स्वातंत्र्यही त्यांची निष्ठा होती आणि ते प्राप्त झाल्यावर त्याच्या संवर्धनासाठी त्यांनी प्रयत्न केलेले दिसतात. तारुण्यात ते स्वातंत्र्यासाठीच्या क्रांतिकारकांच्या प्रयत्नात अग्रेसर होते. १९३७ पर्यंत त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. अंदमानातल्या कारावास, रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा काळ यांत देखील त्यांची कविता त्यांना सोडून गेलेली नाही. पण जे ध्येय उराशी बाळगले ते पूर्ण झाल्यावर ते समाधानी झालेले दिसतात. आपण जे व्रत स्वीकारले ते अंधपणाने नाही हे ते आपल्या कवितेतून स्पष्ट मांडतात. ते म्हणतात,
‘की घेतले न व्रत हे अम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने,
जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे‘
त्यांचा कुठेही संभ्रम नाही. त्यामुळे येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला तोंड देण्याची त्यांची तयारी होती. ते वाट चुकलेले वेडे नव्हते, तर स्वातंत्र्याचे वेड उराशी बाळगून वाट निर्माण करून चालणारे आचारवीर होते. त्यामुळेच त्यांच्या काव्यात कुठे निराशा झाकोळलेली दिसत नाही. उलट त्यात स्फूर्तीचे स्फुल्लिंगच विखुरलेले दिसतात.
स्वातंत्र्यपूर्व कालापेक्षा स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्यांच्या देशप्रेमाबद्दल, त्यागाबद्दल, निष्ठेबद्दल शंका घेण्यात आल्या. त्यांना मानहानीला तोंड द्यावे लागले. या स्वातंत्र्यवीरांची अवहेलनाच करण्यात आली. याचे त्यांना मनस्वी दु:ख झाले असणार. परंतु त्या दु:खाला मनातच बंदिस्त करून त्यांनी कवितेचा निरोप घेतला असावा असे वाटते. देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या या महाकवीने आपल्या मानहानीला, उपेक्षेला शब्दबद्ध केले नाही, यांतच त्यांचे मोठेपण दडलेले दिसते. सावरकरांनी देशासाठी केलेल्या त्यागाला इतिहासात तोड नाही. देशभक्ती हा त्यांच्या साहित्याचा पाया आहे. जेव्हा त्यांच्या बंधूंना अटक, शिक्षा झाली तेव्हा ते म्हणतात,
‘हे काय बंधू असतो जरी सात आम्ही,
त्वस्थंडीलीच दिधले असते बळी मी’
हे सांगताना देखील ते पुराणकथेचा दाखला देऊन यशाची खात्रीच देत असावेत असे वाटते. श्रीकृष्ण हा वसुदेवाचा आठवा पुत्र. त्यानेच दुष्ट्प्रवृत्तीचा नाश केला. कंसाचा संहार केला. त्याप्रमाणे ब्रिटीश सत्तेचा संहार करण्यासाठी आपले सात बंधू असते तार ते ही या कमी दिले असते, असे त्यांना नमूद करावयाचे असावे असे वाटते. म्हणजे सातत्याने अंगीकृत कार्याचा त्यांना कधीच विसर पडलेला दिसत नाही. त्यांची जीवननिष्ठा प्रबळच होती.
सावरकरांची कविता विविध रंग घेऊन अवतरते. त्यांत राष्ट्रभक्तीचे आवाहन आहे. स्वातंत्र्याचा हुंकार त्यातून ऐकू येतो. इतिहासाच्या मागोव्याबरोबरच भवितव्याचा वेध घेण्याची क्षमता त्यात आहे. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणां मिळाले?’ असं मत ठाम करून हा क्रांतिकारक योदधा, प्रेमाची तरलता तितक्याच प्रभावीपणे मांडताना दिसतो, हे त्यांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. त्यांनी कवितेचे वेगवेगळे प्रकार हाताळताना पोवाड्याकडे पण तितक्याच तन्मयतेने लक्ष दिलेले दिसते.
‘तोफेआधी मरे न बाजी, सांगा मृत्यूला’ असं ठामपणे सांगणारा बाजीप्रभू ते प्रभावीपणे मांडतात. बाजीप्रभूच्या त्यागाची महती गातानाच ते जनसामान्यांच्या ह्रिदयाला हात घालतात आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्यज्योत प्रज्ज्वलित करतात. ते त्यांच्या जीवननिष्ठेमुळेच होय ! त्यांनी रचलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती तार स्फुरण देणारीच आहे.
जॉन मिल्टन या कविप्रमाणे स्वा. सावरकरदेखील आपल्या देशवासियांना या आपल्या स्वातंत्र्यासाठी, सामाजिक समता, समरसतेसाठी कटिबद्ध होण्याचा मंत्र देत म्हणतात, ‘Awake, arise or be ever fallen.’ परंतु त्यांना ‘be ever fallen’ ही मिल्टनची कल्पना मान्य नाही. हा कर्ममार्गावरचा पांथस्थ निराशेने वा शंकेने कधी ग्रासला असावा असे दिसत नाही. त्यांना वाटते, ‘awake, arise and be successful.’
त्यांना मृत्यूचे भय कधीच नव्हते. ते यमयातना सोसताना देखील कंटाळून गेले नाहीत. मृत्यूचे छायेत असताना देखील आणि अंदमानच्या काळकोठडीतून समोर वधस्तंभ रोज दिसत असताना देखील मृत्यू त्यांना शिवू शकला नाही. शेवटी त्यांनीच मृत्यूला बोलाविले आणि प्रायोपवेशन करून मृत्यूला कवटाळले. ते नेहमी म्हणत, ‘अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला.’
तुरुंगात लेखनासाठी कसलेही साहित्य उपलब्ध नसताना केवळ पाठांतराच्या बळावर आणि घायकुतीच्या काट्याने त्यांनी महाकाव्याची बैठक असणारी कविता लिहिलेली दिसते. त्यांच्या काव्यात साहित्य विचाराबरोबरच सामाजिक समतेचा, प्रबोधनाचा विचार देखील तितक्याच तळमळीने व्यक्त झालेला दिसतो. त्यांची भाषा संस्कृतप्रचुर आणि अर्थपूर्ण आहे. त्यांच्या कवितेत आवेश आहे. आशयघनता आहे. त्यांची कविता चिंतनशील आहे. त्यांची कविता वीररस घेऊनच जन्मते. अर्थात प्रेमाची भावना व्यक्त करताना त्याची बैठक देखील विररसाचीच आहे असे दिसते. त्यांची कविता देशभक्ती घेऊनच जन्मते असे दिसते. त्यांच्या कवितेत महाकाव्याचे गुण दिसतात. त्यांनी आयुष्यभर जपलेली मूल्ये आणि जीवननिष्ठा त्यांच्या कवितेत साकारताना दिसतात हेच खरे.
डॉ. प्रल्हाद अ. कुलकर्णी
११, ‘यशोदा’, रत्नदीप सोसायटी,
माधवनगर रस्ता,
कुपवाड (सांगली) ४१६४२५
भ्रमणध्वनी ९०११२८६८४४.
मागे वळून पाहताना.............
Sunday, October 2, 2011
मागे वळून पाहताना.............
जर आपण प्राचीन इतिहासाकडे सहजपणे नजर टाकली तर ह्या देशाची सहस्रावधी सुवर्णपाने आपल्या पराक्रमाने, बुद्धीने, प्रचंड साहसाने लिहिणाऱ्या हजारो तरुण-तरुणींची यादी पहावयास मिळते. ज्याप्रमाणे महाभारतापासून ही उदाहरणे आपल्याला दिसतात त्याप्रमाणे ऐतिहासिक कालावधीत सुद्धा पहावयास मिळतात.
हरिहर बुक्क आणि त्यांचे गुरु विद्यारण्य यांना स्वातंत्र्याचा ध्यास लागला होता. शिवाजी महाराज व त्यांचे मावळे तानाजी, जीवा महाला, संभाजी, येसाजी यांच्या मरणाने तर मृत्यूलाही प्रेरणा मिळाली. जीवाची बाजी खेळलेले, स्वातंत्र्याची मशाल खेळलेले असे राजाराम महाराज यांची कारकीर्द तर ‘न भूतो न भविष्यति’ आहे. सर्व हाल-अपेष्टा सहन करणारे खंडो बल्लाळ, रघुनाथपंत हणमंते. औरंगजेबाचे दफन ह्या महाराष्ट्र भूमीत करणारे महाराणी ताराबाईचे श्रेष्ठ सेनापती संताजी, धनाजी ह्यांचे कार्य इतिहासात सोनेरी पानांत लिहिले आहे.
दिल्लीच्या गादीची अपेक्षा करणारे थोरले बाजीराव, वसईचा संग्राम करणारे चिमाजीअप्पा. अटकेपार झेंडा रोवणारे राघोबादादा पेशवे, “बचेंगे तो और भी लढेंगे” याचा नारा लावणारे दत्ताजी शिंदे ह्या लोकांनी स्वातंत्र्याच्या संघर्षाचा इतिहास लिहिला आहे. अशा ह्या ऐतिहासिक परंपरेप्रमाणे अन्य क्षेत्रातही आपल्या प्रयासाने, साहसी प्रयत्नाने जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्जवल केले आहे.
बुद्धिबळाच्या पटावर आपले नाव उज्ज्वल करणारा विश्वनाथन आनंद, एव्हरेस्टवर झेंडा रोवणारे संतोष यादव, सचिन तेंडूलकर, धावपटू पी.टी. उषा ह्याप्रमाणे कार्य करणाऱ्यांची यादी काही कमी नाही. ब्रिटिशांच्या विरुद्ध सशत्र क्रांती करणारे मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ह्या आदर्श लोकांमुळे आपण ताठ मानेने स्वातंत्र्यात वावरतो.
कर्तृत्वाला दाही दिशा मोकळ्या असतात. उद्योगपती टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, चौगुले अशा एक ना अनेक आघाडयांवर आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणारे लोक या भारतभूमीत जन्माला आले.
गलिच्छ राजकारणाच्या नादी लागून एकमेकांची डोकी फोडण्यात धन्यता मानणारे भन्नाट वेगाने गाडी चालवताना स्वतःचा आणि इतरांचा जीव घेणारे कॉलेज तरुण, आपल्या अंगावर कमीतकमी वस्त्रे परिधान करून विकारांना आव्हान देणाऱ्या युवती हे लोक देशाचे नाव काय अजरामर करू शकतील ? कोणता इतिहास लिहू शकतील ? आपल्या वैभवशाली इतिहासाकडे पाहून आपण काय करीत आहोत, याचा कधी विचार केला आहे का ? ह्या देशात सर्व जिहादी आतंकवाद वाढतो आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराचे रान माजले आहे. ह्या भारतमातेचा गळा हळू हळू आवळला जात आहे. बाकीची राष्ट्रे ह्या भारताला धमकावीत आहेत. ह्या भारतमातेच्या रक्षणाचा विचार कोणी करतो आहे का? सर्वच आपल्या सुखाच्या डोहात डुंबत आहोत. भारतावर कितीही अस्मानी सुलतानी संकटे आली तरी आपण हार मनात नाही. म्हणूनच अन्याय, भ्रष्टाचार, आतंकवाद, जातीयवाद अशा प्रकारच्या सर्वांना दाबून टाकण्यासाठी थोडसं मागे वळून पहावे लागते. ह्यासाठी सुदृढ, शरीर व कणखर मनाची आवश्यकता लागते. योगाभ्यासामुळे मनाची ताकद वाढते. निर्णयशक्ती वाढते. दृढनिश्चयी व्यक्तिमत्व निर्माण होते. स्वातंत्र्यवीरांना सोनेरी अक्षरात लिहिलेला इतिहास वाचल्यावर अंगात धैर्य निर्माण होते. देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या वीरांना आठवलं की अंगात स्फूर्ती निर्माण होते. मागे वळून इतिहासाचा शोध घेतल्यास आपणही गौरवशाली इतिहास लिहू शकू. त्यासाठी फक्त मागे वळून पहा.
चारुलता कुलकर्णी
जे एन ४/१४/१४, सेक्टर ९,
वाशी नवी मुंबई-४००७०३
दूरध्वनी क्र. २७६५२९९४

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य-डॉ. वि. वा. देशपांडे
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यात देशभक्ती ओतप्रोत भरलेली आहे. त्यात क्रांतीचे ओज आहे नी आवेश आहे. त्यामुळे एखादे देशभक्तीपूर्ण ओजस्वी काव्य ऐकले की ते त्यांचेच असणार अशी ऐकणाऱ्याची खात्री असते. येथे माझा एक अनुभव सांगून मी हे सुस्पष्ट करतो. त्यावेळी मी जयपूरला एका संघटनेच्या कार्यक्रमास गेलो होतो. कार्यक्रमानंतर एखादे मराठी गीत सादर करण्याचा आग्रह केला. मी गर्जा जयजयकार क्रांतीचा हे गीत सादर केले. त्यानंतर तेथील एक जण म्हणाला ह्या काव्याचा हिंदीत अनुवाद झाला आहे आणि आम्ही ते गीत म्हणत सत्याग्रह करत असू. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत आहे. त्यांचे बोलणे थांबवत मी त्यांना सांगितले की हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत नाही. कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकरांचे गीत आहे. त्यावर दुसरा गृहस्थ म्हणाला की असे गीत स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय दुसरा कोणी लिहूच शकणार नाही. इतर सर्वांनी त्यास दुजोरा दिला आणि मी एकटाच पडल्याने लोकशाही पद्धतीप्रमाणे मला माझा पराभव मान्यच करावा लागला. सांगावयाचे तात्पर्य, स्वातंत्र्यवीर सावरकर हेच क्रांतीसूक्त लिहू शकतात. कारण ते त्यांचे बोल अनुभवाचे आणि असामान्य प्रतिभा निर्मित आहेत अशी त्यांची उदंड कीर्ती आहे. एका दृष्टीने पाहता तसे त्यांना वाटणे अगदी स्वाभाविकच आहे. सोपानदेव चौधरी एका कडव्यात म्हणतात,
अनुमान नको, अनुभूती हवी
असली कविता चिरकाल नवी
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य असामान्य प्रतिभा आणि असामान्य अनुभव या दोन पायांवर ताठ उभे आहे. कविवर्य शंकर वैद्य यांना असे वाटते की स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि कुसुमाग्रजांची कविता देशभक्तीच्या जातकुळीची, मृत्युन्जायी जिद्दीची आणि अफाट कल्पनाशक्तीची आहे. डॉ. पंडितराव पवार आणि डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांचेही तसेच मत आहे. आपण फार तर असे म्हणू शकतो की या दोन तात्यांच्या काव्यात साम्य असण्याचे कारण हे असावे की
सावरकरांच्या काव्याचा प्रभाव कुसुमाग्रजांवर असणार. दोघांचाही आशावाद जबरदस्त आहे. सावरकर सागरास आवाहन देऊन ऐकवतात की माझी मातृभू “कथिल अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला” तर कुसुमाग्रज म्हणतात, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल उठतील या ज्वालेमधुनी भावी क्रांतीचे नेते”. सावरकर जन्मजात देशभक्त नी जन्मजात कवी होते. त्यामुळेच सन १८९४ ला वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी माधवराव पेशव्यांवर ते काव्य रचू शकले. प्रत्यक्ष लोकमान्य टिळकही त्यांचे बालवयातील थोर काव्य पाहून आश्चर्यचकित झाले. पण सावरकरांना अभिमान शिवला नाही. कारण बालवयात ज्ञानेश्वरी रचणारे ज्ञानेश्वर असू शकतात, त्या दृष्टीने स्वतःचे काव्य काही विशेष नाही असे त्यांना वाटे. पण त्यांच्या काव्याची झेप किंवा हनुमान उडी केवढी मोठी होती हे त्यांच्या जगन्नाथाचा रथ या कवितेवरून लक्षात येते. ते सूर्यनारायणालाच प्रश्न करतात – “महाराज अपुली कथा ना कुठे निघे स्वारी”
“दिक क्षितीजांचा दैदिप्य रथ तुझा सुटता” ह्या कालपथाच्या अतूट उतरणीवरता” “मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी” या कल्पनाशक्तीला अथवा कल्पनाविलासतेला तोड नाही. खरेतर ते एक महाकवीच होते. संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. व्यास, वाल्मिकी नी कालिदास यांच्या श्रेणीत बसू शकणारे ते महाकवी होते. केवळ आदराच्या भावनांमुळे हे लिहीत नाही. त्यांच्या विराट काव्याचे दर्शनाने कोणीही निष्पक्ष माणूस असेच म्हणेल. ही त्या काव्याची गुणवत्ता जेवढी मोठी होती तेवढेच त्यांचे काव्यही मोठे होते. अडीच हजारांपेक्षा अधिक कडव्यांचे गोमंतक काव्य आणि आठशेपेक्षा अधिक कडव्यांचे कमला काव्य असून कमला काव्याचा जन्म कारागृहाच्या भिंतीवर झाला हे मोठे आश्चर्यकारक वाटते. १९२२ साली त्यांनी विजनवासी नाव धारण करून ते प्रसिद्ध करविले. त्यात निसर्गाचे सुरेख वर्णन असून प्रियकर मुकुल शत्रूच्या हाती लागल्याने कमलाची ताटातूट त्यांच्या स्वतःच्या अनुभवासारखीच वाटते. साहित्याचार्य महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास यांना हे काव्य त्यांना महाकवी पद देण्यास योग्य वाटते.
त्यांचे काव्य कधी पोवाड्यांचे तर कधी आरतीचे रूप धारण करते. त्यात विविधता आहे. त्यात रसांचीही विविधता आहे. देशभक्ती हा दहावा रस त्यात ओतप्रोत भरून “सागरा प्राण तळमळला” म्हणून तो कारुण्यपूर्ण शब्दांनी कधी प्रकट होतो तर कधी “हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा” या पराक्रमी शब्दाने प्रकट होतो. पण त्यांच्या काव्याचा स्थायीभाव किंवा अंतरीचा भाव आहे देशभक्ती ! त्यांनी आपले सर्वस्व मातृभूमीला वाहियले आणि टी जाज्वल्य देशभक्ती आणि तिचे प्रखर तेज ज्या घुबडांना सहन होणे शक्य नव्हते त्यांनी त्यातील काही ओळी निषिद्ध मानल्या तर ते स्वाभाविकच होते.
स्वातंत्र्याचे स्तोत्र त्यांनी तारुण्यात १९०३लाच रचले. त्यातील संस्कृत शब्द, मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे या शब्दामागील हिंदुतत्वज्ञान, गेयता, आवेश आणि मुख्य म्हणजे तुजसाठी जनन व मरण मानणारी देशभक्ती त्या काव्यात त्यांच्या काव्याच्या बिजाप्रमाणे असल्याचे जाणवते. वेदांती आणि वदती यासारखे यमक नी प्रास साधणारे शब्दालंकार आणि गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली या शब्दांतील अर्थालंकार मनाला मोहून टाकतात. हिंदूची व्याख्या करताना पुष्पभू आणि पितृभू हे जे शब्द वापरण्यात आले तेच शब्द तेच तत्वज्ञान काव्यात मांडण्याकरिता प्रियकर हिंदुस्थान या काव्यात १९०८ला प्रकट झाले. पुढे “सागरास” ही कविता १९०९ला ब्रिटनच्या किनाऱ्यांवर त्यांना स्फुरली.
स्वातंत्र्यवीरांचे काव्य त्यांची देशभक्ती गर्जणाऱ्या सागरास भरती आल्यासारखे वाटते. त्या सागराजवळ जावे आणि देशभक्तीच्या भावनेने ओलेचिंब व्हावे असे वाटते. त्यांचे जीवनच महाकाव्याचा विषय ठरावे असे भव्यदिव्य असल्याने व ते सारे काव्य त्यांच्या अनुभूतीचा अविष्कार असल्याने महाकवि विनायकाय नमः म्हणून कोणीही त्यांच्या पवित्र स्मृतीपुढे नतमस्तकच होईल. आजच्या कालानुरूप त्या देशभक्तीची जाणीव कुसुमाग्रजांनी करून दिली आहे. त्यांच्या चार ओळी उधृत करून हा लेख समाप्त करतो.
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे
करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा
मेजाखालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका

जगात पुरातन काळापासून स्त्रियांना दुय्यम स्थान का?-- श्रीवर्धन वेलणकर
या लेखाचे प्रयोजन काय, असा प्रश्न प्रथम वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. पुष्कळदा वरवर विचार करणाऱ्यांना ‘मनुस्मृती’ हे त्याचे कानीकपाळी सतत पडणारे कारण पटेल. स्त्रियांना दुय्यम स्थान मनुने दिले असा सर्वत्र प्रचार होत असतो. त्यात कितपत तथ्य आहे? ‘न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति’ हे त्याचे वचन त्यासाठी पुढे करण्यात येते. त्या वाक्याचा चुकीचा अर्थ नेहमी लावण्यात येतो. स्त्रिया स्वातंत्र्याला पात्र नाहीत असा त्याचा अर्थ नाही. प्रथमपासूनच अगदी आजच्या काळात सुद्धा खेड्यात काय आणि शहरात काय, सर्वसामान्यपणे स्त्रीचे जीवन धोक्याचे आहे. म्हणून स्वतंत्रपणे वावरणे हे स्त्रियांच्या दृष्टीने गैर आहे असा त्याचा अर्थ आहे. याच मनुने लिहिलेले दुरे वाक्य मात्र तथाकथित पुरोगामी सोयीस्कररीत्या विसरतात. ते वाक्य असे आहे “यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः“ म्हणजे जेथे स्त्रियांना सन्मान मिळतो तिथे देवतांचे वास्तव्य असते. हे लिहिणारा मनू प्रतिगामी होता काय? मुख्य गोष्ट म्हणजे हा मनू ब्राम्हण नसून क्षत्रिय होता. दुसरी गोष्ट – मनुने हे नियम बनविले नाहीत तर त्याचे संकलन केले. नियम आधीपासूनच अस्तित्वात होते. काळाच्या ओघात त्या त्या काळाच्या गरजेनुसार अनेक स्मृती निर्माण झाल्या. उदा. देवल स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती इ. द्यानार्जनाच्या बाबतीत पुरातन काळातही गार्गी, मैत्रेयी, सुलभा अशा ब्रह्मवादिनी होत्या. म्हणजे त्याही त्या वेळच्या पुरुषांच्या तुलनेत बुद्धिमत्तेत कमी नव्हत्या. दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ति म्हणजे जगातील कर्तृत्ववती स्त्रिया (भल्या-बुऱ्या) पुरुषनिरपेक्ष झाल्यावरच मोठ्या झाल्या. उदा. मेधा पाटकर, हिलरी क्लिंटन, मदर तेरेसा, तस्लिमा नसरीन, ऑंग सान स्युई, मार्गारेट थॅचर, सिरिमाव बंदरनायके, बेनझीर भुत्तो, मायावती, ममता, मीराकुमार, सुचेता कृपलानी. या आधुनिक काळातील तार सोडाच, पण ऐतिहासिक काळातही मातोश्री जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची उदाहरणे पहा. या सर्वांनी स्वतंत्रपणे कर्तृत्व गाजविलेले आहे. श्रीमत आद्य शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांच्या वादात अध्यक्षपदी मंडणमिश्राची सुविद्य पत्नी सरस्वती होती आणि मुख्य म्हणजे तिने शंकराचार्यांच्या बाजूने निर्णय दिला. स्वर्गातून निघालेल्या गंगानदीचा प्रवाह इतका जोरदार होता की भगवान शंकरांना तो मस्तकी झेलावा लागला. इतरांत ती शक्ती नव्हती. बहिणाबाई चौधरींची गाणी सर्वसामान्य खेडवळ भाषेतील रत्नांची खाण आहे. अडाणी कालिदासाची निर्भत्सना करून त्याला महाकवी या पदवीस पोहोचविण्यास त्याची पत्नीच कारणीभूत ठरली.
आजच्या जगात जरा डोळे उघडून पहा. सैनिकी शिक्षण, वैमानिक, एस. टी., रेल्वे मोटरमन, गिर्यारोहण, सहली आयोजन संस्था, पोस्ट ऑफिस, बँका, इन्शुरन्स कंपन्या, जलतरण स्पर्धा, जागतिक राजकारण, कुष्ठरोग निवारण, आता तर स्त्रियांची स्वतंत्र दहीहंडीही असते. (गोपिकांची). या सर्व बाबतीत आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. निसर्गाने स्त्रियांवर मातृत्व लादले आहे. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत अनेक दिव्यातून स्त्रियांना जावे लागते. तो त्यांचा पुनर्जन्मच असतो. इतकेच नव्हे तर मूल तीन वर्षांचे होईपर्यंत त्याचा आहार विहार, विकार इ. नोकऱ्या करूनही त्यांना सांभाळावे लागतात. मला अशी उदाहरणे माहित आहेत की दोघे कामावरून दमून आल्यावर, बायकोला एक कप चहा करून देणेसुद्धा नवरोबा टाळतो. या गोष्टींना क्वचित अपवाद असतीलही पण ते शेवटी अपवादच आहेत. ही गोष्ट केवळ भारतातच नाही तर सर्व जगात आहे.
आता अन्य क्षेत्रात मोठी असलेली माणसे कशी संकुचित विचारांची असतात हे पाहू. रामदास स्वामी ‘सावधान’ म्हणताच लग्नमंडपातून पळून गेले. जर त्यांचा पिंड वैराग्यशील होता तर ते मुळात बोहल्यावर उभेच का राहिले? ते पळून गेल्यावर त्यांच्या नियोजित वधूचे काय झाले? त्या काळी तिचा पुन्हा विवाह जमणे शक्य नव्हते. म्हणजे सक्तीचे ब्रम्हचर्य तिला पाळावे लागले असणार! श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘नवसे पुत्र होती तर का करणे लागे ‘पती’? पण दुसरी बाजू त्यांनी सांगितली नाही. ‘नवसे पुत्र होती तर का करणे लागे ‘पत्नी ’? हे त्यांनी म्हटले नाही. नवस पुरुषही करतात. आचार्य विनोबांना एकदा काही तरुण मुली भेटावयास गेल्या. तेव्हा त्यांनी रोडसाइड रोमिओंच्या त्रासाबद्दल सांगितले. तेव्हा विनोबांनी त्यांना या त्रासास ‘Eve Teasing‘ का म्हणतात याच्यावर एक प्रवचन ऐकवले. ‘Eve‘ म्हणजे Evening चा शॉर्टफॉर्म आणि Eve म्हणजे आदम आणि ईव्ह मधली Eve हा सर्व त्या संदर्भात अप्रयोजकपणा नव्हता का? फाळणीच्या आसपास गांधीजी नौखालीत शान्तिप्रस्थापानेसाठी गेले, तेव्हा त्यांनी आपले ‘ब्रह्मचर्याचे प्रयोग करण्यासाठी विवस्त्र अवस्थेत (म्हातारपणी) आपल्या तरुण नातीशेजारी’ झोपणे पसंत केले. त्या तरुण मुलींवर याचा विपरीत परिणाम झाला नसता का? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी सौ. यमुनाबाई त्यांच्या शेवटच्या आजारात रुग्णालयात अत्यवस्थ होत्या. आपण आता थोड्याच दिवसांच्या सोबती आहोत हे लक्षात आल्यावर आपल्याला रुग्णालयातून घरी न्यावे व आपल्याला आपल्या घरीच सावरकर सदनातच मृत्यू यावा अशी त्यांची शेवटची इच्छा होती. पण ही साधी इच्छाही पुरी करण्याचे सावरकरांनी नाकारले आणि रुग्णालयातच त्यांचा मृत्यु झाला. आधी एकदा भेटून गेल्यावर सावरकर पुन्हा त्यांना रुग्णालयात भेटावयासही गेले नाहीत. अशी ही मोठी माणसे!
भारतात संतपरंपरेतही मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई अशा अधिकारी स्त्रिया होऊन गेल्या. दुसरी एक विचित्र गोष्ट म्हणजे पतीचे निधन झाल्यावर पत्नीने स्वखुशीने किंवा सक्तीने सती जाणे. ही अतिशय दुष्ट चाल होती. (जिवंतपणी अग्निप्रवेश) त्याचे आणखी एक कारण होते. समाजाच्या त्या काळच्या अवस्थेत विधवा स्त्रियांना सुरक्षित वाटत नसे. त्याहीपेक्षा वाईट चाल म्हणजे त्यांना देवदासी, भाविणी बनवून देवालयाचे पावित्र्य नष्ट करणे. संत कान्होपात्रेचे उदाहरण यासाठी पुरेसे ठरावे. तसेच नेभळट अशा रजपूत राजांनी (मानसिंग) मानमरातब, खासदारकी मिळविण्यासाठी अकबरासारख्या व्यसनी (चांदणी चौकातील मिनाबझार) बादशहांना आपल्या बहिणी देणे. (त्यांच्या इच्छेविरुद्ध) आधुनिक काळातही सिनेमा नाटकातल्या नटीचे खासगी आयुष्य कसे असुरक्षित असते हे रोजच्या वृत्तपत्रातून समजते. ‘नाटकशाळा’ हा शब्द का रूढ झाला हे स्पष्ट आहे. आता जरा पौराणिक काळाकडे वळू. प्रभुरामचंद्रांनी सीतादेवीसारख्या साध्वीला अग्निदिव्य करायला लावले आणि त्यानंतरही क्षुद्र धोब्याच्या बोलण्यावरून गरोदर अवस्थेत तिला अरण्यात पाठविले. सुदैवाने तिला वाल्मिकीसारखे थोर ऋषी भेटले म्हणून बरे. तिनेही शेवटी लवकुशांना जन्म देऊन मोठे केल्यावर रामासमक्षच धरणीच्या पोटात शेवटचा आश्रय घेतला. आता कुंतीचे उदाहरण! कुंतीने ऋषीची मनोभावे सेवा केल्यावर तिच्या अल्लड वयाचा विचार न करता ऋषीने तिला सूर्य, इंद्र, इत्यादींचे वर दिले आणि उत्सुकतेपोटी वरमंत्रांचा स्वीकार केल्यावर तिला कौमार्यातच मातृत्व प्राप्त होऊन पुढे कर्णाची शोकांतिका आणि महाभारत घडले. ज्ञानी म्हणवणाऱ्या त्या ऋषीला हे कळत नव्हते का? दुसरे असेच एक ऋषी (पराशर) मत्स्यगंधेबरोबर रममाण होऊन नंतर तिच्या भावी आयुष्याचा विचार न करता ‘साद देती हिमशिखरे’ म्हणत हिमालयात तपश्चर्येसाठी (पापक्षालनासाठी!) निघून गेला. आणि पुढे व्यासाचा जन्म आणि महाभारत घडले. (शंतनू, भीष्म इ.) आणखी एक विचित्र प्रथा म्हणजे भीष्मांनी युद्धात राजांचा पराभव करून त्यांच्या बहिणी, लेकी (त्यांच्या इच्छेचा विचार न करता) विचित्रवीर्य, आंधळा धृतराष्ट्र यांच्या गळ्यात बांधावयाच्या (गांधारी, अंबा, अंबिका, अंबालिका ही उदाहरणे पुरेशी ठरावीत.) द्रौपदीला स्वयंवरात मत्स्यभेद करून अर्जुनाने जिंकले होते. मग त्याच्याशीच तिचा विवाह न करता पाच पांडवांच्या गळ्यात तिला का बांधले? तिची या गोष्टीला संमती असणेच शक्य नव्हते. कारण द्रौपदीसारखे दुसरे उदाहरणही नाही. पतीचे निधन झाल्यावर जर प्रेमाखातर तिने सती जायचे तर मग प्रेमाखातर एकही पुरुष ‘सती’ (सता) गेला नाही हे कसे? उलट तो पुन्हा विवाह करी. हा कुठला न्याय?
माझ्या माहितीतील काही उदाहरणे विचित्र आहेत. पूर्वी वैद्यकीय योग्य आणि त्वरित उपचाराअभावी स्त्रिया बाळंतपणात मरत असत. पुन्हा पुन्हा लग्न करण्यास पुरुषास मोकळीक (अपत्यप्राप्तीसाठी). यात घर सांभाळणाऱ्या सासूचा काही दोष नसे. पण तिलाच ‘सूनमारी’ म्हणून संबोधण्यात येई. आधुनिक विचारांचा वारा लागलेले एक उदाहरण मला माहित आहे की, बायकोला लागोपाठ तीन मुळीच झाल्यावर पुत्र व्हावा (वंशवृद्धी आणि स्वर्गप्राप्तीसाठी) म्हणून त्या माणसाने पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध समागम करावयास लावला. हा एक प्रकारे कायदेशीर ‘बलात्कार’च नाही का? मेनकेकडून तपोभंग झाल्यावर तिच्यापासून झालेल्या ‘शकुंतलेला’ विश्वामित्राने डोळ्यावर आडवा हात ठेऊन वाऱ्यावर सोडले. बिचाऱ्या कणव ऋषीला तिचे संगोपन करावे लागले. पुढे त्यांच्याच आश्रमात येऊन तिला भुलवून तिच्याशी गुप्तपणे विवाह करून दुष्यंत आपल्या राजधानीला निघून गेला. पण पुढे तिची काहीच विचारपूस त्याने केली नाही. अंगठी हरविणे इ. भ्रामक कथा कालिदासाने आपल्या नायकाचा ढोंगीपणा लपविण्यासाठी रचल्या आहेत. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी राम वनवासाला गेला. पतिव्रता म्हणून सीताही त्याच्या मागोमाग निघाली. वास्तविक लक्ष्मणाला बरोबर जाण्याचे तसे काही कारण नव्हते. बरे, जायचेच होते तर उर्मिलेलाही बरोबर घेऊन जायचे. सितेलाही तिची सोबत वनवासात झाली असती. वाटले तर privacy साठी शेजारी शेजारी झोपड्या बांधून राहावयाचे. तसे केले असते तर पुढचे सगळे रामायण झालेच नसते आणि मंदोदारीलाही रावणाला कह्यात ठेवणे सोपे झाले असते. बिचाऱ्या शूर्पणखेचे नाकही शाबूत राहिले असते. बिभिषणावरही फितुरीचा आरोप आला नसता आणि बिचारे कुंभकर्ण, इंद्रजित सुखाने राहिले असते. हनुमानाला द्रोणागिरी उपटून आणावा लागला नसता आणि सुषेण वैद्याला आपले ज्ञान पणाला लावावे लागले नसते. माझ्यासारख्या सामान्य लेखकाला हे सुचते, तर त्या काळातील मोठमोठ्या विद्वानांना ही साधी गोष्ट कशी सुचली नाही याचे खरोखर फार आश्चर्य वाटते. आधुनिक काळात लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’, साने गुरुजींची ‘श्यामची आई’, श्री. न. पेंडसेंच्या ‘गारंबीचा बापू’, ‘तुंबाडचे खोत’ अशा नवे बदलून लिहिलेल्या कादंबऱ्यातूनही तत्कालीन स्त्रियांची असहायता दिसून येते. चि. वि. वैद्यांच्या पेशवेकालीन ‘दुर्दैवी रंगू’ कादंबरीत हीच दृश्ये दिसतात. ‘मस्तानी’चा घरच्याच लोकांनी केलेला छळ (केवळ तिचे थोरल्या बाजीरावावर निस्सीम प्रेम होते म्हणून) आकलनापलीकडील आहे. आधुनिक काळात डॉ. आनंदीबाई जोशींनी अमेरिकेत जाऊन पदवी संपादन केली. नंतर त्या भारतात आल्यावर आजारी झाल्या. पण त्या केवळ परदेशी जाऊन ‘बाटल्या’ म्हणून पुण्यातील ‘भीषग्वर्यांनी’ त्यांच्यावर उपचार करण्याचे नाकारले आणि त्या वारल्या. एक सावित्रीबाई फुले यांचे उदाहरणच अपवाद आहे.
वरील सर्व लिहिण्यामागे कोणाचाही अधिक्षेप करण्याचा माझा हेतू नाही. मी ज्या घटना मांडल्या आहेत त्या इतरांनाही माहित आहेत. मी फक्त त्यात विशिष्ट संगती शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आता यापुढे आधुनिक काळातील स्त्रियांवरील अन्यायाच्या काही सत्यकथा मांडणार आहे. मात्र खरी नवे ण सांगता त्या वेगळ्या नावाने लिहिणार आहे. (कारण त्यांच्या खऱ्या नावांच्या उल्लेखामुळे कोणालाही मनस्ताप होऊ नये हा त्यामागील हेतू आहे.)
१) वेडाबाई मोलकरीण – या बाईला वेडाबाई नाव कोणी ठेवले त्याला अतिशहाणाच म्हटले पाहिजे. खरे तर तिच्या इतकी शहाणी बाई (न्हावी जातीची) मी क़्वचितच पहिली आहे. तिचे मूळ नाव लक्ष्मी होते. तरुण वयातच ती विधवा झाली. तिला बायजा नावाची मुलगी होती. जावई आळशी होता. काही कामधंदा करीत नसे. त्याला चार मुलगे होते. मोठा अंबाबाईचा भगत होता. त्याचे नाव पंड्या. दुसरा दसऱ्या, तिसरा मोत्या, चौथा बारक्या. मोठ्याला बायको होती. ती बुद्धीने जरा अर्धवट होती. वेडाबाई बिचारी चार घरी धुणी, भांडी, दळण, मोलमजुरी करून या सगळ्यांचा संसार चालवीत होती. न्हावी जातीची असूनही अंघोळ (गार पाण्याने) केल्याशिवाय तोंडात पाणी घालत नसे. चार घरे एकमेकांपासून लांब होती. पण पायी चालण्याशिवाय उपाय नव्हता. माझ्या लहानपणी तर मी तिला घरातलीच एक समजत होतो. लहान मुलांच्या दुखण्यावर तिच्याजवळ घरगुती स्वस्त उपाय होते. हे सर्व असूनही गर्व किंवा आदळआपट नव्हती. काळाच्या ती फार पुढे होती. स्वतः चार बुकेही शिकली नसली तरी शिक्षणाचे महत्व ती जाणून होती. ब्रिटिशांच्या त्या काळात (धुळ्यासारख्या ठिकाणी) तिने पंड्या सोडून बाकीच्या चौघांना व्हर्नाक्युलर फायनल (व्ह.फा.)परीक्षा द्यावयास लावल्या. मागास जातीचे असल्यामुळे त्या नातवंडांना कलेक्टर ऑफिस, सिव्हील कोर्ट, पोलीस खाते, वाहतूक खाते या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या. त्यांची लग्नेही झाली आणि नंतर वेडाबाईला तिच्या उतार वयात पतवंडेही झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे तिची नातवंडे तिचा त्याग आणि शहाणपण ओळखून होते. म्हणून तिच्या नातसुनाही तिच्याशी प्रेमळपणे वागत. आयुष्याची तिची अखेरची वर्षे खूप समाधानात गेली. आपली आजी आपल्याकडे राहावी म्हणून तिच्या नातवंडात भांडणे लागत. शेवटी वर्षभरात तीन तीन महिने ती एकेका नातवाकडे राहत असे. तिला ते कामाला हात लावू देत नसत. आपल्या जुन्या कामांच्या ठिकाणी भारी इरकली लुगडे नेसून ती जाऊन आली. मला म्हणाली, भाऊ, देवाने माझे गाऱ्हाणे ऐकले. मी आता समाधानी आहे. त्याने मला आता केव्हाही न्यावे. मी तयार आहे. धन्य ती शहाणाबाई!
२) माझ्या ओळखीच्या एका घरी अंबिका म्हणून एक विधवा बाई राहत असत. त्यांचा विवाह बालपणीच (१५-१६ वर्षे). त्यांच्याहून जवळ जवळ २२-२३ वर्षांनी मोठ्या माणसाशी करण्यात आला. ते गृहस्थ लौकरच वारले. त्यावेळी विधवा विवाहाची प्रथा नव्हती. त्यामुळे अंबिकाबाईंना पुढचा सारा जन्म नातलगांच्या आधारे त्यांच्या त्यांच्या कामात मदत करून काढावा लागला. व्यक्तिगत आवडी निवडी बाजूला ठेवाव्या लागल्या. कोकणातल्या माहेरच्या माणसांनीही त्यांच्याकडे पाठ फिरविली. चार यत्ता शिकल्या असल्यामुळे निदान लिहिता वाचता तरी येत असे. वाचून वाचून त्या बुद्धिबळे खेळण्यास शिकल्या. पुढे इतरांच्या मदतीने त्या पत्त्यांचे ब्रीजसारखे खेळ शिकल्या. बॅडमिंटनसारखे खेळही शिकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कालांतराने असाध्य विकार होऊन त्या वयाच्या साठीत वारल्या. उत्तरेस काशीयात्रा करण्याची त्यांची इच्छा मात्र दुर्दैवाने अपुरीच राहिली.
३) विदर्भात एके ठिकाणी माझ्या ओळखीच्या एक महिला होत्या. त्याकाळी व्हर्नाक्युलर परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. शिवणकाम, विणकाम, भरतकाम, स्वयंपाक यात त्यांना गती होती. वाचनही चांगले होते. त्या (यमुनाबाई) आम्हाला सेक्सटन, ब्लॅक टायगर, टींकर यांच्या डिटेक्टीव गोष्टी रंगवून सांगत असत. त्यांचा विवाह एका हुशार वकिलाबरोबर झाला होता. पण ते १९३०च्या गांधीजींच्या चळवळीत गेले आणि पोलीस लाठीमारात त्यांच्या मेंदूला धक्का बसून ते ठार वेडे झाले. यमुनाबाईंचे आयुष्यच बदलून गेले. आयुष्यभर त्यांना आणि वृद्ध सासऱ्यांना त्यांना सांभाळावे लागले. त्यांच्या धाकट्या वकील झालेल्या दिरांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली. सासरे आणि पतीच्या निधनानंतर काही वर्षांनी त्या आजारपणात गेल्या. त्यावेळी आपल्या अंतकार्यासाठी त्यांनी पाचशे रुपये ठेवले होते. गावातील सुशिक्षित घरातील मंडळींनी त्यांचे अंत्यविधी केले. शिकलेल्या असल्यामुळे लिहिण्या वाचण्यात तरी त्यांचा वेळ जात असे.
माझ्या ओळखीच्यापैकी एक कर्तृत्ववान महिला कोकणातील खेड्यात बरेचसे आयुष्य गेल्यामुळे लिहिण्या वाचण्यास शिकू शकल्या नाहीत. दीर्घायुष्य लाभूनही साध्या करमणुकीपासून त्या वंचित राहिल्या.
माझ्या ओळखीच्या आणखी एक घरातील मुलगी इंदिरा मेट्रिक, इंटर आर्टस, हिंदी कोविद झाली. एका डॉक्टरांशी तिचा विवाह झाला. पण पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी शक्यता असूनही त्यांना शाळेत शिक्षिकेचा व्यवसाय करता आला नाही. मोठ्या घरात त्यांचा जन्म रांधा, वाढा उष्टी काढा’ अशा कामातच गेला. सासर माहेरच्या लहान मोठ्या आप्तांसाठी त्यांचे घर म्हणजे अंगण-ओसरी होते. कोणाच्याही घरात लहान मोठ्या मंगलकार्यात त्या कधी दुर्मुखलेल्या नव्हत्या. त्यांचे निधन झाल्यावर शेजारपाजारच्या मुलींनाही अश्रू आवरले नाहीत.
आता मी हळू हळू लेखाच्या शेवटाकडे येत आहे. यात मला मनात सतत टोचणाऱ्या विषयाचा विचार केला आहे. या सर्व सत्यकथा आहेत. पण अर्थातच नावे बदलली आहेत. (कारण उघड आहे) त्या त्या व्यक्तींच्या सध्या विद्यमान असलेल्या लहान मोठ्या आप्तांच्या भावना दुखवू नयेत हा त्याचा हेतू आहे. वाचकांना वरील सर्व मजकूर पटेल, आवडेल असा विश्वास वाटतो. लेख प्रसिद्ध झाल्यास, संपादक महोदयांना आपल्या अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात, मी आभारी होईन. अस्तु !

Subscribe to:
Posts (Atom)